ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रसामाजिक

फत्तेसिंगराव नाईक ( आप्पा ) सहकारी दूध संघाच्या संयुक्त विद्यमानाने पशुसंवर्धन विभाग वैरण विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोफत मक्का बियाणे प्रचिती दूध संघाचे संचालक भूषण नाईक यांच्या हस्ते वाटप


शिराळा प्रतिनिधी: डॉ अनिल खोत

पावलेवाडी . (ता शिराळा ) : फत्तेसिंगराव नाईक ( आप्पा ) सहकारी दूध संघाच्या संयुक्त विद्यमानाने पशुसंवर्धन विभाग वैरण विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोफत मक्का बियाणे प्रचिती दूध संघाचे संचालक भूषण नाईक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना संघा मार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती तसेच शासकीय योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्यासाठी दूध संघ कायम प्रयत्नशील असतो. शासकीय योजनाचा फायदा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी दूध संघाचे चेअरमन.संचालक मंडळ कर्मचारी. प्रयत्नशील असतात दूध संघामध्ये आपण आजारी जनावरांसाठी iso मानांकित खेकडा मापक दरामध्ये शेतकऱ्यांना देत आहोत त्यामुळे शेतकऱ्यांचा आजारी जनावरांच्यावर होणारा खर्च कमी होण्यास मदत होईल. अशी माहिती भूषण नाईक यांनी दिली.

यावेळी उपस्थित मान्यवर संतोष पावले, सर्जेराव पावले, गोरख लवटे,रामचंद्र पाटील, सविता नांगरे, नंदा पावले, शांता लवटे, सविता पावले, यशोदा गायकवाड इत्यादी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *