महसूल दिना दिवशीच महसूल प्रशासनाच्या विरोधात शिराळ्यात उपोषण
*महसूल दिना दिवशीच महसूल प्रशासनाच्या विरोधात शिराळ्यात उपोषण*
प्रतिनिधी(शिराळा) शासनाचे अनेक अधिनियम, निर्णय,परिपत्रक हे लोकांना न्याय देण्याकरिता असताना महसूल विभागाचे अधिकारी,कर्मचारी यांचा मनमानी कारभार करत आहेत, याविरुद्ध चिखली येथील निखिल बाळकृष्ण साळुंखे महसूल दिना दिवशीच तहसील कार्यालय शिराळा येथे उपोषण करणार आहे.
याबाबत निवेदन मा.जिल्हाधिकारी सांगली,उपविभागीय अधिकारी इस्लामपूर,तहसीलदार शिराळा,पोलीस निरीक्षक,शिराळा पोलीस ठाणे यांना देण्यात आली आहेत.
निवेदनात मा.जिल्हाधिकारी सांगली यांना जलसंपदा मंत्री यांनी शेतकऱ्यांच्या समवेत बैठक घेऊन पंधरा दिवसाच्या आत निर्णय पारित करा असे आदेश दिले असताना,गेले एक महिन्याच्या कालावधीत होऊनसुद्धा कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही, उपविभागीय अधिकारी वाळवा इस्लामपूर यांच्याकडे भूसंपादन कायदा नुसार देण्यात आलेल्या अर्जा वरती दोन वर्षाच्या कालावधीत कोणतीच कार्यवाही नाही. तहसील शिराळा विषयी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुक्यातील समस्यांचा सोडवणूक होण्याकरिता लोकशाही दिन तहसील कार्यालयात घेण्यात येत नाही.नागरिकांचीसनद शुल्क सहित लावण्याचे आदेश असताना,तलाठी व मंडळ कार्यालयात काही ठिकाणी दिसून येत नाहीत.अभिलेख कक्षातील कागदपत्रे गायब आहेत.भूमी अभिलेख कार्यालय शिराळा येथील मोजणी प्रक्रिया ऑनलाइन होऊन सुद्धा अर्जाच्या नंबर प्रमाणे मोजणी होत नाही.तसेच वरिष्ठ कार्यालयाकडे वर्षभर अहवाल दिले जात नाहीत.
या सर्व बाबींचा निषेध व्यक्त करण्या करिता चिखली येथील निखिल बाळकृष्ण साळुंखे हे महसूल दिनी तहसील कार्यालय शिराळा येथे उपोषण करणार आहेत.

