आर. एम. हायस्कूल व आदर्श विद्यालय, मिरज येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहामध्ये संपन्न
सांगली विभागीय उपसंपादक अशोक मासाळ
*आर. एम. हायस्कूल व आदर्श विद्यालय, मिरज येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहामध्ये संपन्न.*
दि हिंद एज्युकेशन सोसायटी मिरज संचलित, आर. एम. हायस्कूल व आदर्श विद्यालयात आज दि. 01/08/2025 रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती असा संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.*
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मराठे सर व आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. पाटील मॅडम हे उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी आर. एम. हायस्कूल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. भातमारे सर होते.
लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे श्री. मराठे सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. भातमारे सर व आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. पाटील मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यालयामध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. अनेक विद्यार्थ्यांनी खूप सुंदर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक मध्ये श्री. शिंदे आर. व्ही. सर यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या विषयीची अधिक माहिती सांगितली. अण्णाभाऊ साठे लिखित कथा, कादंबऱ्या, आत्मकथन याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणामध्ये श्री. मराठे सर यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनातील काही प्रसंग व अण्णाभाऊ साठे यांच्या विषयीची विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच सौ. पाटील मॅडम व श्री. भातमारे सर यांनी आपल्या मनोगता मध्ये लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या विषयीची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री. शिंदे आर. व्ही. सर यांनी केले. कार्यक्रमाची क्षणचित्रे श्री. मासाळ सर व श्री. प्रसाद पवार सर यांनी टिपली. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.*
सांगली विभागीय उपसंपादक अशोक मासाळ.

