ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोकशाहीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची : पृथ्वीसिंग नाईक


लोकशाहीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची : पृथ्वीसिंग नाईक

शिराळा : प्रतिनिधी

येथील विश्वासराव नाईक कला वाणिज्य आणि बाबा नाईक विज्ञान महाविद्यालयात मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त ‘पत्रकार दिन’ व पत्रकार सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकारांना पुष्पगुच्छ व शिल्ड देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन प. पू. स्वामी विवेकानंद सेवाश्रम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड. भगतसिंग नाईक (नाना ), सचिव मा. विश्वप्रतापसिंग नाईक (दादा ), उपाध्यक्ष तथा सन्माननीय नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक (बाबा ) यांच्या शुभहस्ते

करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव विश्वप्रतापसिंग नाईक होते.

पृथ्वीसिंग नाईक बोलताना म्हणाले की, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आजच्या डिजिटल युगात बातम्या वेगात पसरताना दिसत आहे. मात्र त्याची सत्यता पडताळणे हे मोठे आव्हान पत्रकारासमोर आहे.

नाईक पुढे म्हणाले, बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण च्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे जे कार्य सुरु केले, त्याचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे असे ही म्हणाले.

अध्यस्थानावरून विश्वप्रतापसिंग नाईक आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिले मराठी वर्तमान पत्र सुरु केले. त्यानंतर मराठी पत्रकारितेने समाजाच्या विकासासाठी निरंत्तरपनणे प्रयत्न केले आहेत. अशा थोर पत्रकारांचा आदर्श घेऊन आपणही समाजाच्या उन्नतीसाठी काम करावे असे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र बनसोडे यांनी केले. यावेळी प्रा. डॉ. दस्तगीर पठाण व विठ्ठल नलवडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास उपप्राचार्य तथा नगरसेवक प्रा. राजसिंह पाटील, बी. आर. दशवंत, महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्रशासकीय सेवक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. प्रमोद पाटील यांनी केले तर आभार डॉ. तानाजी हवलदार यांनी मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *