ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सांगली जिल्हा उद्योग विभाग महाराष्ट्र शासन , मिटकॉन व कै.बापुसो शिंदे बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ॥मोबाईल रिपेअरी कोर्स॥ च्या शिबिराचे उद्घाटन


आज सांगली जिल्हा उद्योग विभाग महाराष्ट्र शासन , मिटकॉन व कै.बापुसो शिंदे बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ॥मोबाईल रिपेअरी कोर्स॥ च्या शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले.

या शिबिरासाठी २० मुली व १५ मुलांची उपस्थिती होती.या योजनेनुसार १ महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यावर शासनाकडून प्रमाणपत्र व १ हजार मानधन देण्यात येईल. काही लघू उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू .या कोर्ससाठी पात्र उमेदवार १९ ते ४५ वयोगटातील असावा, तसेच प्रशिक्षणार्थीकडे आधारकार्ड, शाळा सोडलेला दाखला( sc जात प्रमाणपत्र), दहावी बारावी सर्टिफिकेट ची झेरॉक्स, फोटो अशी कागदपत्रे असावीत. रोज ४ तास या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाईल. आजून २ दिवस प्रवेश सुरू राहतील अशी माहिती कोर्सचे प्रशिक्षक राहुल बल्लाळ यांनी दिली.

यावेळी महाडीक युवाशक्तीचे सुजीत थोरात, जिल्हा उद्योग कार्यालयाच्या निरीक्षक सुनीता देसाई, मिटकॉनच्या प्रतिनिधी सौ योगिता निंबाळकर, श्री.संग्राम शिंदे यांनी मार्गदर्शन केले. आभार अनिल कांबळे यांनी मानले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *