ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष-दलित महासंघ(वायदंडे गट)-मा. नागनाथ घाटगे (सर) यांच्या हस्ते बहिणीला बिबिबट्याच्या हल्लायातून सुटका करणाऱ्या शिवम चा सन्मान


उपवळे (ता.शिराळा) येथील शिवम संग्राम पाटील (वय ११) यांनी आपल्या बहिणीवर झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यातून धाडसाने तिची सुटका करून घेतली व तिचा जीव वाचवला. लहान वयातील त्याचे हे धैर्य सर्वांसाठी प्रेरणादायी असून या घटनेची शासनाने दखल घेऊन शिवम चा सन्मान करावा. असे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष-दलित महासंघ(वायदंडे गट)-मा. नागनाथ घाटगे (सर) यांनी केले.

उपवळे गावातील हनुमान मंदिराजवळील मध्यवर्ती भागात राहणाऱ्या ९ वर्षीय स्वरांजली पाटील हिच्यावर बिबट्याने हल्ला करून तिला जखमी केले. यावेळी ११ वर्षाचा भाऊ शिवमने प्रसंगावधान राखत तिला बिबट्याच्या तावडीतून सोडवले.शिवम च्या धाडसांबद्दल मा.नागनाथ घाटगे (सर) यांनी शिवम चार राहत्या घरी भेट देऊन त्यांचा सत्कार केला तसेच जखमी स्वरांजली च्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी स्वरांजलीचे वडील संग्राम पाटील, आई स्वप्नाली पाटील, आजोबा आनंदराव पाटील, आजी लिलाबाई पाटील व महिला कराटे प्रशिक्षक -कल्याणी पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *