ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रसामाजिक

केंद्र सरकारने अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा – अनिरुद्ध कांबळे


 

उपसंपादक शिवाजी नांगरे

 

विश्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती बांबवडे या ठिकाणी भारतीय दलित महासंघाच्या वतीने साजरी करण्यात आली.

दीप प्रज्वलन व प्रतिमा पुजन शाहूवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित पाटील , पोलीस उपनिरीक्षक परशुराम शिरसाट ,कॉन्स्टेबल विनोद जाधव व महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रवीण कुंभारे यांच्या हस्ते करण्यात आले . पोलीस निरीक्षक अमित पाटील ,भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध गौतम कांबळे , प्रवीण कुंभारे , भारतीय दलित महासंघाचे शाहूवाडी तालुका अध्यक्ष आकाश कांबळे , भारतीय बौद्ध महासभेचे प्रकाश कांबळे यांनी विश्व साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या परिवर्तनवादी साहित्यावर भाषणे केली . विश्वसाहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांना केंद्र सरकारने तात्काळ भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध गौतम कांबळे यांनी केली . भारतीय दलित महासंघाचे जिल्हा सरचिटणीस अमोल कांबळे यांनी सूत्रसंचालन केले . सदरच्या कार्यक्रमा दरम्यान एपीआय अमित पाटील , परशुराम शिरसाट , प्रवीण कुंभारे , रामभाऊ परळीकर ,प्रतिक्षा चौगुले , संस्कृती सिद्धार्थ बनसोडे , चंद्रकांत कदम , अशोक कांबळे , रामचंद्र खोपडे , तानाजी साठे ,यांचा विविध क्षेत्रात गौरवस्पद कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला . सदरच्या कार्यक्रमास श्रीकांत कांबळे ,बबलू चौगुले ,दयानंद कांबळे ,अमोल माळी ,दिलीप मोरे ‘सिद्धार्थ बनसोडे ‘संतोष कट्टे ‘विनोद आढाव , सतीश ट्रॅक्टर ,सुरज कांबळे ,आकाश गायकवाड , विकास भोसले , विक्रम शेळके , शाहरुख पेटकर , महेंद्र जाधव , गणेश सातपुते , धनाजी तुपारे , किरण कांबळे व इतर भारतीय दलित महासंघाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते . आभार भारतीय दलित महासंघाचे जिल्हा संपर्कप्रमुख दयानंद कांबळे यांनी मानले .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *