विहीर व नदीवरील विजेच्या मोटरी अज्ञात चोरट्याकडून चोरी संर्दभात दोषींना अटक करावी… विराज नाईक
बिऊर (ता. शिराळा) येथे गेल्या काही दिवसापासून विहीर व नदीवरील विजेच्या मोटरी अज्ञात चोरट्याकडून चोरी होत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या घटनांची दखल घेऊन सत्वर कार्यवाही करावी. या प्रकरणातील दोषींना अटक करून कायदेशीर कारवाई करावी. या मागणी संदर्भात विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष विराज नाईक यांनी आज शिराळा पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पोलिस उपनिरीक्षक उदय पाटील, साहाय्यक पोलिस निरीक्षक सागर नरुटे, डी. बी. विभागाचे अमर जाधव, महीला पोलीस हवालदार शेख आदींनी श्री. नाईक यांच्याशी चर्चा केली. याबाबत तातडीने कार्यवाही करू, असे ग्रामस्थांना आश्वस्त केले. यावेळी दिगंबर पाटील, पंडित पाटील, महादेव पाटील, गणपती पाटील, प्रवीण पाटील, पोपट पाटील, सुरेश पाटील, महादेव पाटील, मानसिंग पाटील, सुभाष पाटील, दीपक पाटील, राजू पाटील आदी उपस्थित होते.

