ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

वारणा धरणाचे वक्राकार दरवाजे बंद,वारणा नदीपात्रात होणारा विसर्ग बंद


*वारणा धरणाचे वक्राकार दरवाजे बंद,वारणा नदीपात्रात होणारा विसर्ग बंद*

शित्तूर – वारुण ( शिवाजी नांगरे) वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसाची तीव्रता कमी झाल्याने वारणा धरणातून दिनांक 21/08/2025 रोजी रात्री 6.00 वाजता वक्र द्वाराद्वारे सुरू असणारा विसर्ग पूर्णपणे बंद करून विद्युत गृहातून सुरु असणारा 1630 क्युसेक एवढाच विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. धरणातील विसर्ग बंद झाल्यामुळे वारणा नदीची पाणीपातळी कमी होऊन पोटमळीत शिरलेले पाणीही कमी होऊन पाण्याखालची पिके मोकळी होणार असून नदीकाठच्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *