ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रायगड नागरी सहकारी पतसंस्थेच्या 2024-25 या सालाचा लाभांश वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.


आष्टा  विभाग प्रतिनिधी, सचिन खराडे

आष्टा ता.वाळवा येथील रायगड नागरी सहकारी पतसंस्थेच्या 2024-25 या सालाचा लाभांश वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी बोलताना संस्थापक चेअरमन श्री.संभाजी सुर्यवंशी यांनी संस्थेची माहिती दिली भाग भांडवल 1.8 कोटी, ठेवी 7.14 कोटी, कर्जे 6.50 कोटी, गुंतवणूक 3.25 कोटी, स्वनिधी 80 लाख, 31 मार्च कर नफा 32.48 लाख इतका झाला असून संस्थेच्या प्रगतीत सर्व संचालक सेवक वर्ग यांचे मोलाचे योगदान आहे. त्याचबरोबर संस्थेच्या कार्यालयीन वेळेत येऊन सभासदांनी आपला 10 % प्रमाणे लाभांश घेऊन जावे असे आवाहन केले.

यावेळी उपस्थित संस्थेचे संस्थापक चेअरमन मा.श्री.संभाजी सुर्यवंशी (राजे) संचालक तुषारराजे सुर्यवंशी, शिवाजी डांगे, जयकुमार रूकडे, ऑडिटर राजेंद्र पाटोळे साहेब, सचिव किरण गायकवाड अजय शिंदे अक्षय चव्हाण व सभासद उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *