ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रिळे गावच्या ग्रामपंचायत व नागरिक यांच्या वतीने बदली झालेल्या शिक्षकांचा व नवीन रजू झालेल्या शिक्षकांचा सत्कार


 

रिळे येथे गावचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष सर्व सदस्य, शिराळा पंचायत समितीचे विषय तज्ञ श्री.मधुकर डवरी सर ,पोलीस पाटील, ग्रामसेवक मंँडम,गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक सर्व पालक बंधू भगिनी, विद्यार्थी वर्ग जिल्हा परिषद शाळा रिळे येथील सर्व शिक्षक स्टाफ या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आज बदली झालेल्या शिक्षकांचा निरोप समारंभ व नवीन रुजू झालेल्या शिक्षकांचा सत्कार आयोजित करण्यात आला या समारंभाने सर्वजण भारावून गेले.*

*आदरणीय सौ वंदना आ.पाटील मॅडम, सौ हसीना पठाण मॅडम, सौ वंदना बा.पाटील मॅडम..*

*यांनी गेली सात वर्षे रिळे गावामध्ये शिक्षिका म्हणून अतिशय आदर्श, निष्ठावान आणि प्रेरणादायी सेवा बजावली विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची गोडी निर्माण करून त्यांना संस्कार ,शिस्त आणि आत्मविश्वास दिलात. यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे रिळे शाळेचा आणि गावाचा मान अधिक उंचावला आहे.*

*जिल्हा परिषद शाळा रिळे येथे बदलीने हजर झालेल्या अनुक्रमे श्री प्रकाश कुरणे सर, सौ वैशाली कुरणे मॅडम, सौ राजश्री कुंभार मॅडम, सौ शुभांगी तिखे मॅडम या सर्व शिक्षकांचे स्वागत करताना ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य. 💐💐*


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *