राजेबागेश्वर परिसरातील कांबळे कुटुंबियांनी ठेवला समाजापुढे आदर्श.. महाडीक युवाशक्तीचे सुजीत थोरात यांच्या हस्ते सत्कार
राजेबागेश्वर परिसरातील कांबळे कुटुंबियांनी ठेवला समाजापुढे आदर्श घरातील तीन सदस्य शासकीय अधिकारी असून सामाजिक कामात अग्रेसर असतात. कुटुंब प्रमुख श्री. विनोद कांबळे (दादा) हे सध्या महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात तलाठी पदावर कार्यरत आहेत, सम्राट व्यायाम मंडळाच्या माध्यमातून अनेक मुलांचे करियर घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. हँडबॉल आणि जीम मधे सध्या १०० मुले प्रशिक्षण घेत आहेत. तसेच ज्यांचा सत्कार करण्यात आला त्या त्यांच्या पत्नी महाराष्ट्र पोलिस विभागात कार्यरत आहेत *सौ दीपीका जोंजाळ यांची नुकतीच पोलीस निरीक्षक(पी आय)* पदावर बढती झाली आहे. विनोद दादाचा लहान भाऊ आमचा बाल मित्र *श्री. प्रवीण कांबळे यांची भारतीय सैन्यात हवालदार पदावर बढती झाली आहे.* त्याबद्दल त्यांचा सत्कार *महाडीक युवाशक्तीचे सुजीत थोरात* यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी सतीश पवार, सचिन पवार, सचिन पाटील,अविनाश पाटील, अभिजीत शिंदे, धीरज कबूरे, शुभम यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

