आष्टा शहरातील प्रमुख मार्गाला छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असे नाव देण्यात यावे
आष्टा विभाग प्रतिनिधी सचिन खराडे
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे प्रेरणा स्थान आहेत
आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा उल्लेख गौरवाने केला जातो छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णा कृती पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणार आहे .*आष्टा शहरातील सोनुबाई झंवर स्वागत कमान ते दत्त मंदिर आष्टा या आष्टा शहरातील प्रमुख मार्गाला छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असे नाव देण्यात यावे* या मागणीचे निवेदन शिव सम्राट फाउंडेशन च्या वतीने आष्टा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांना देण्यात आले यावेळी महेश गायकवाड, चेतन मोहिते, बाहुबली हालुंडे, तनवीर मुजावर, अभिजीत मगदूम, दिपक गायकवाड उपस्थित होते

