धनगर समाज बांधवांवरील खोटे ॲट्रॉसिटी व इतर गुन्हे तात्काळ मागे घ्यावे यासाठी जिल्ह्यातील पोलीस ठाणे व तहसीलदार यांना निवेदन
*धनगर समाजाच्या वतीने मा. घनश्याम बापू हाके व धनगर समाज बांधवांवरील खोटे ॲट्रॉसिटी व इतर गुन्हे तात्काळ मागे घ्यावे यासाठी जिल्ह्यातील पोलीस ठाणे व तहसीलदार यांना निवेदन*

धनगर समाजातील मेंढपाळ महिलेवर व समाज बांधवांवर मारहाण करून महिलेचा हात मोडण्यात आला या संदर्भात मा.घनश्याम बापू हाके यांनी समाज बांधव व महिलेची विचारपूस करून त्यांनी तक्रार केली परंतु उलट तक्रार न घेता यांच्यावरच सूडबुद्धीने खोटे ॲट्रॉसिटी चे इतर गुन्हे दाखल केले हे गुन्हे तात्काळ मागे घेणेत यावे यासाठी कोल्हापूर जिल्हा धनगर समाजाच्या वतीने वडगाव पोलीस ठाणे हातकणंगले पोलीस ठाणे व तहसीलदार हुपरी पोलीस ठाणे व शिरोली पोलीस ठाणे यांना निवेदन देण्यात आले जर तात्काळ गुन्हे मागे नाही घेतले तर धनगर समाजाच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला यावेळी उपस्थित संजय काळे वैभव हिरवे संपत रूपने जगन्नाथ माने अमोल गावडे शहाजी शिद अन्नाशीद कृष्णात पुजारी संदीप हजारे कागल म्हाळू पुजारी व समाज बांधव उपस्थित होते
आपल्या हक्काचे चैनल *सतर्क लाईव्ह न्युज साठी पन्हाळा प्रतिनिधी प्रकाश भाऊसो गोरड*

