घरात घुसून रात्री बारा ते साडे बाराच्या दरम्यान बिबट्याचा पाळीव कुत्र्यावर प्राणघातक हल्ला.
शित्तूर – वारुण (शिवाजी नांगरे) शाहूवाडी तालुक्यातील शित्तुर वारुण येथील अक्षय गंगाराम पाटील यांच्या घरातील पाळीव कुत्र्यावर( रॉटविलर)बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे त्याच्यावर शित्तूर – वारुण येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
भर मानवी वस्तीत रात्री घरात येऊन बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याने ग्रामस्थातून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी देखील परिसरात अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन लोकांना झाले आहे, वारंवार होत आहे.त्याने अनेक कुत्री घरातून पळवून नेलि आहेत तर शेळ्यावर हल्ला करून त्यांना ठार केले आहे. परंतु घरातच बांधलेल्या कुत्र्यावर रात्री बारा- साडेबाराच्या दरम्यान हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले दरम्यान घरातील लोकांनी आरडा ओरडा केल्यानंतर बिबट्या त्यास सोडून पळाला त्यामुळे घरातच केलेल्या हल्ल्यामुळे नागरिकांतून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी या कुटुंबाने व परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे.

