वारणा धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग गौरी गणपती विसर्जणामुळे संध्याकाळी 7.00 नंतर सोडला जाणार
शित्तूर – वारुण ( शिवाजी नांगरे) वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यामुळे जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता धरणातून दिनांक 02/09/2025 रोजी दुपारी 12.00 वाजता वक्र द्वाराद्वारे 3365 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार होता व विद्युत गृहातून 1630 क्युसेक असा एकूण 4995 क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात येणार होता, परंतु *गौरी गणपती विसर्जनामुळे संध्याकाळी 7.00 वाजल्यानंतर सोडण्यात येणार असल्याचे वारणा धरण प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे*

