ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शित्तूर – वारुण मधून कार्यकर्ते मुंबईकडे रवाना. आंदोलकांच्यासाठी गावातून 2000 पुरण- पोळ्या.


शित्तूर – वारुण (शिवाजी नांगरे) मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या काना- कोपऱ्यातून समाजबांधव मुंबई मध्ये एकवटत आहेत.गणेशोत्सव काळात मुंबई मध्ये आंदोलक आपले घर – दार सोडून,उपाशी-तापाशी आंदोलनात सहभागी झाले आहेत. आंदोलनास पाठींबा देण्यासाठी शित्तूर – वारुण मधून तानाजी भोसले आणि ग्रामस्थ सोबत गौरी – गणपती सणाच्या 2000 पुरणपोळ्या घेऊन आज रात्री रवाना झाले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *