ताज्या घडामोडीमहाराष्ट्रशिक्षण

मांगले येथील चारुशीला पाटील यांना पी.एच.डी.


मांगले येथील चारुशीला पाटील यांना पी.एच.डी.

मांगले (ता. शिराळा)

मांगले विभाग प्रतिनिधी, दत्तात्रय तडाखे

मांगले गावच्या चारुशीला समीर पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत मुंबई युनिव्हर्सिटी येथून पीएच.डी. पदवी मिळवली आहे. त्यांनी मेडिकल मायक्रोबायोलॉजी ह्या विषयावर संशोधन कार्य पूर्ण केले. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण मांगले गावाचा आणि परिसराचा अभिमान वाढला आहे.

चारुशीला पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात सातत्याने परिश्रम घेत संशोधन कार्य पूर्ण केले. त्यांच्या संशोधन प्रबंधाला तज्ज्ञांनी उत्तम प्रतिसाद देत मान्यता दिली आणि त्यांना प्रतिष्ठेची पीएच.डी. पदवी बहाल करण्यात आली.

त्यांच्या या यशामागे पती समीर पाटील, कुटुंबीयांचा, मार्गदर्शक प्राध्यापकांचा मोलाचा सहभाग आहे. गावातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

चारुशीला यांच्या या यशामुळे गावातील तरुणाईस प्रेरणा मिळाली असून मुलींनी शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती साधावी, असा आदर्श त्यांनी घालून दिला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *