वारणा धरणातून विसर्ग वाढवला, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
शित्तूर – वारुण
उपसंपादक शिवाजी नांगरे
वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सलग होत असलेल्या अतिवृष्टीमुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता धरणातून दिनांक 19/08/2025 रोजी सकाळी 10.00 वाजता वक्र द्वाराद्वारे 29,000 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे व विद्युत गृहातून 1630 क्युसेक असा एकूण 30630 क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. पाउस चालू/वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्गात वाढ करण्यात येईल.
तरी नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा वारणा धरण प्रशासनाकडून देणेत आला आहे. वारणा नदीच्या पाणी पातळीतळीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून शित्तूर – आरळा पूल आणि चरण – सोंडोली पूल तसेच सोंडोली – मालेवाडी पूल पाण्याखाली गेले असून शिराळा – शाहूवाडी तालुक्यातील दळणवळण पूर्णपणे बंद झाले आहे.

