ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

‘एक राखी सैनिक भावासाठी ‘ नाईक महाविद्यालयाचा उपक्रम


‘एक राखी सैनिक भावासाठी ‘ नाईक महाविद्यालयाचा उपक्रम

 

शिराळा : प्रतिनिधी

 

येथील विश्वासराव नाईक कला, वाणिज्य आणि बाबा नाईक विज्ञान महाविद्यालयात महिला मंच समिती आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून ” एक राखी सीमेवरील सैनिक भावासाठी” हा उपक्रम राबविण्यात आला. या jउपक्रमांतर्गत महाविद्यालयातील अनेक विद्यार्थिनींनी स्वतः सैनिक भावासाठी राख्या तयार करण्यात आल्या.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र बनसोडे म्हणाले, रक्षाबंधन, दिवाळी,दसरा यासारखे सण आपल्या सैनिकांना आपल्या कुटुंबापासून दूर सीमेवरच साजरे करावे लागतात. पण देशात कुठेतरी एक लहानशी बहीण त्यांच्या मनात प्रेमाचा, विश्वासाचा आणि बंधाचा एक नाजूक धागा पाठवते. ही भावना त्यांच्या मनात दिलासा देते की देश त्यांना विसरलेला नाही. हा अनुभव त्यांच्यासाठी केवळ एका राखीपुरता मर्यादित नसतो तर तो असतो संपूर्ण राष्ट्राचं त्यांच्यावरील असणार प्रेम आणि कृतज्ञेचे प्रतीक आहे

म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी सैनिकांसाठी तयार केलेल्या राख्यांचे संकलन करून आज त्या देशाच्या विविध सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या.

या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ऍड. भगतसिंग नाईक (नाना), सचिव विश्वप्रतापसिंग नाईक(दादा), उपाध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक (बाबा )यांनी महाविद्यालयातील विध्यार्थीनीचे कौतुक केले.

या कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. राजसिंह पाटील, महिला मंच आणि सांस्कृतिक विभाग समन्वयक डॉ उज्वला बिरजे, प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *