ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीय

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे राजकारण करू नका वंचित बहुजन आघाडीचा इशारा…..


महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे राजकारण करू नका वंचित बहुजन आघाडीचा इशारा……

शिराळा येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे नियोजित जागेवरील अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी स्मारक व्हावे या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला जात असताना अलीकडेच आमदारांनी ह्या स्मारकासाठी जवळपास 1 कोटी 75 लाख रुपये मंजूर करून आणले आहेत परंतु नियोजित जागा ही महाराष्ट्र शासनाच्या नावावर असून त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग नगरपंचायत व महसूल प्रशासन यांच्यामध्ये समन्वय होऊन स्मारकाचा प्रश्न निकाली लावणे अपेक्षित असताना ऐन निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी अतिक्रमण न काढता खुल्या जागेची मापे घेण्याचे काम मागील एक-दोन दिवसात केलेले निदर्शनात येत आहे तरी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आंबेडकरी अनुयायांना भुलवण्याचे काम सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही ..

आज वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष निखिल कांबळे व शिष्टमंडळाचे सार्वजनिक बांधकाम विभागास भेट देत रीतसर निवेदन देत स्मारकाचा प्रश्न कायदेशीर सोडवणूक करण्याची विनंती केली आहे.. उपस्थित तालुका महासचिव आकाश कांबळे. तालुका उपाध्यक्ष स्वप्निल मधुकर कांबळे. सुनील घोलप युवराज सातपुते संपत कांबळे आर्यन कांबळे अजित शिवमारे बलवंत कांबळे अमोल लोखंडे संदीप बागडे उपस्थित होते..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *