ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

वारणा धरणातून होणाऱ्या विसर्गात वाढ.धरण 93.97%भरले   


वारणा धरणातून होणाऱ्या विसर्गात वाढ.धरण 93.97%भरले

 

शित्तूर -वारुण ( उपसंपादक शिवाजी नांगरे )वारणा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या संततधार अतिवृष्टीमुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. 34.40 टी. एम. सी. पाणीसाठवण क्षमता असलेले धरण सद्या 93.97% भरले आहे.जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता धरणातून दिनांक 19/08/2025 रोजी सायंकाळी 8.00 वाजता वक्र द्वाराद्वारे सुरू असणारा 34732 क्युसेक्स विसर्ग वाढवून तो 38370क्युसेक करण्यात येणार आहे व विद्युत गृहातून 1630 क्युसेक असा एकूण 40000 क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत मोठया प्रमाणात वाढ होणार आहे. शित्तूर – वारुण परिसरातील शित्तूर – आरळा, चरण – सोंडोली तसेच मालेवाडी – सोंडोली या पुलावर पाणी आल्याने वाहतुकीचे सगळे मार्ग बंद झाले आहेत.शित्तूर – वारुण, शिराळे – वारुण, खेडे, सोंडोली, उदगिरी आदी गावांचा आणि वडिवस्त्यांचा संपर्क तुटल्यामुळे दळण वळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्याच्या महापूर परिस्थितीमध्ये सगळे दळणवळणाचे मार्ग बंद झाल्यामुळे आरोग्याच्या बाबतीत एखादी समस्या उद्भवल्यास नागरिकांनी गोंधळून आणि घाबरून न जाता शित्तूर – वारुण येथील आपल्या दवाखान्याशी संपर्क साधावा असे आवाहन लाईफ लाईन क्लिनिक आणि आयुर्वेदिक सेंटर चे डॉ. संजय मगदूम यांनी सोशल मीडियाद्वारे केले आहे.पावसाचा जोर असाच राहिल्यास अथवा वाढल्यास धरणातून सुरु असलेल्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे वारणा नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहण्याचा इशारा धरण प्रशासनाकडून देण्यात आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *