आष्टा येथील रायगड बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आष्टा यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळा नंबर 9 येथे विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षण पद्धती मिळावी या उद्देशाने (डिजिटल लर्निंग) 43 इंची स्मार्ट टीव्ही संच शाळेस भेट
आष्टा विभाग प्रतिनिधी सचिन खराडे
आष्टा येथील रायगड बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आष्टा यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळा नंबर 9 येथे विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षण पद्धती मिळावी या उद्देशाने (डिजिटल लर्निंग) 43 इंची स्मार्ट टीव्ही संच शाळेस भेट देण्यात आला. मुख्याध्यापक तसेच शिक्षक वृंद यांच्याकडून संस्थेचे आभार व्यक्त करण्यात आले
यावेळी बोलताना श्री. संभाजी सूर्यवंशी म्हणाले; रायगड पतसंस्था रायगड सेवाभावी संस्था ही समाजातील वंचित घटकाला मदत करण्याचे हेतूने स्थापना झाली असून या आधी ही अनेक सामाजिक उपक्रम संस्था राबवत असते. तसेच याही पुढे कोणत्याही प्रकारची शाळेस मदत हवी असल्यास निश्चितपणे केली जाईल असे आश्वासन दिले.
यावेळी उपस्थित रायगड नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन श्री संभाजीराव सुर्यवंशी (राजे) , रायगड बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तुषारराजे सुर्यवंशी, कृष्णा कदम, सचिन खराडे, पुंडलिक बनशंकरी, उत्तमराव पाटील, सचिव किरण गायकवाड, अक्षय चव्हाण, प्रशांत कुत्ते, व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

