ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवी दिल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय बासरीवादक पंडित निरंजन प्रसाद राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार – 2025 चे वाटप..


नवी दिल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय बासरीवादक पंडित निरंजन प्रसाद राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार – 2025 चे वाटप… शिवशाही फाउंडेशन,भारत व निरंजन धारा,लखनऊ यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे मा.प्रेमपाल शर्माजी (IAS) संयुक्त सचिव रेल्वे बोर्ड भारत सरकार व प्रसिद्ध संगीतकार पंडित ब्रीज भूषण गोस्वामी जी आंतरराष्ट्रीय बासरीवादक /NTPC DGM मा.सौरभ बनौधा याचा बासरीवादनाचा कार्यक्रम देशबंधू महाविद्यालय कालकाजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला.सौरभ बनौधा व सुनिल ,

दक्ष याच्या बासरी व तबलावादन यशिका, निवेदिता व

नायर,देवगौरी,शगुन मिश्रा , भावना रावत, साक्षी झा नृत्य व अभिनयाने सर्व श्रोते मंत्रमुग्ध झाले.

दिवंगत पं. निरंजन प्रसाद यांच्या पुण्यस्थितीनिमित्त दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो.पंडीत जी 1960 ते 2005 या काळातील सर्वात आदरणीय आंतरराष्ट्रीय बासरीवादक होते आणि त्यांनी जगभरात आपली बासरी वादन केले. ते राष्ट्रीय वाद्यवृंद समिती चे सदस्य(भारत सरकार) होते.पंडित निरंजन प्रसाद जी यांनीही हिंदी चित्रपटसृष्टीत बासरीवादनाचे काम केले. त्यापैकी काही प्रसिद्ध हिंदी चित्रपट ‘गुड्डी’, ‘शोर’ इ. आहेत.ते आकाशवाणी लखनौ येथे अव्वल दर्जाचे कलाकार म्हणून कार्यरत होते . बासरीवादन मध्ये सर्वात आदरणीय गुरूंपैकी एक होते. 2013 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ‘पंडित निरंजन प्रसाद राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार’ हा निरंजनधारा,लखनऊ तर्फ दिला जातो. या वर्षी शिवशाही फाउंडेशन,भारत आणि निरंजनधारा,लखनऊ यांच्या संयुक्तमानाने हा पुरस्कार देण्यात आला.हा पुरस्कार सामाजिक कार्य, लेखन, प्रशासन, कला आणि संस्कृती,संशोधन अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पाच मान्यवरांना दिला जातो.आम्ही शिवशाही फाउंडेशन,भारत आणि निरंजन धारा,लखनऊ विविध सामाजिक कामे करतो.उदा.शिक्षण,आरोग्य, आयुर्वेद, योग आणि विकास,पर्यावरण, कला व सांस्कृतिक यांसारख्या क्षेत्रांसह या क्षेत्रांमध्ये सतत कार्यरत असते.यावर्षी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पाच मान्यवरांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो.2025 चे पुरस्कार विजेत्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे:- 1.पं.श्री.अशोककुमार– प्रख्यात संगीततज्ज्ञ 2. डॉ.श्री.मूलचन्द्र सिंह -समाजसेवा 3. डॉ. संदिप भोसले (IRS) -उपायुक्त ,प्रशासन 4. डॉ . विशाल वळवी- वैद्यकीय सेवा व आदिवासी न्याय हक्कासाठी लढा 5.श्री. –अरूणकुमार मलिक-नाटक व दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रातील अमूल्य कामगिरीबद्दल पुरस्कार देण्यात आला.हे पुरस्कार स्वर्गीय पंडित निरंजन प्रसाद जी यांच्या 12व्या पुण्यतिथीनिमित्त घोषित करण्यात आले. 4 ऑक्टोबर 2025 देशबंधू महाविद्यालय कालकाजी नवी दिल्ली संस्थेत भव्य पुरस्कार सोहळ्या घेण्यात आला.या कार्याक्रमाचे सूत्रसंचालन कु.लायबा रशिद व भावना यांनी केले.यावेळी देशबंधू महाविद्यालय कालकाजी, नवी दिल्लीचे गुणवंत विद्यार्थीना प्रमाणपत्र व पदक देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे मा.प्रेमपाल शर्माजी (IAS) संयुक्त सचिव रेल्वे बोर्ड भारत सरकार व प्रसिद्ध संगीतकार पंडित ब्रीज भूषण गोस्वामी जी आंतराष्ट्रीय बासरीवादक श्री.सौरभ बनौधा, संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष बाळाराम माडकर – शिवशाही फाउंडेशन,भारत आणि श्रीमती उर्मिला बनौधा संचालक – निरंजन धारा, डॉ.श्रीकारा गौडा- राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवशाही व उद्योजक ,लखनऊ सौ. मनू माथूर डेप्टी जनरल मॅनेजर एन.टी.पी.सी,शिक्षण संस्थाचे प्राचार्य डॉ.राजेद्रकुमार पांडे,NSS विभाग प्रमुख डॉ अजय सिंह गहलोत, विद्यार्थी प्रमुख आयुष्य बुराह , शिखा यादव, प्रियांका सिंह, रितिका,व संस्थेचे खजिनदार प्रतिक कोडूलकर, सचिव ॠतुराज पाटील,योगेश पाटील, शैलेश तेवथिया, नितीन महरौली, विनोद, एडवर्ड जी,सागर डांगर, नवनीत याच्या उपस्थितीत

सर्व विजेताना पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी PCOX GROUP व डॉ.विजयसिंह उपायुक्त , डॉ.नकुल कोरडे, डॉ अंबादास माडकर, संस्थेचे व्यवस्थापन समितीचे विशेष सहकार्य लाभले…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *