मोठं – मोठया खड्यांची मुरूम टाकून सार्वजनिक बांधकाम विभाग शाहूवाडी यांचेकडून तात्पुरती डागडुजी.
शित्तूर – वारुण (शिवाजी नांगरे) शित्तूर – वारुण येथील ग्रामपंचायत कार्यालय परिसर ते सुरेश नांगरे यांचे घरासमोर मुख्य रस्त्यावर पडलेल्या मोठं – मोठया खड्यांची मुरूम टाकून सार्वजनिक बांधकाम विभाग शाहूवाडी यांचेकडून तात्पुरती डागडुजी.
शित्तूर – वारुण ते आरळा या मुख्य रस्त्यावर गेली अनेक दिवस ग्रामपंचायत कार्यालय परिसर ते सुरेश नांगरे यांचे घर या दरम्यान मोठे खड्डे पडले होते. सदरच्या रस्त्यावरून शित्तूर – वारुण, शिराळे – वारुण, खेडे, उदगिरी, उखळू आणि वाडी – वस्तीवरील लोकांचे येणे – जाणे तसेच उदगिरी देवालयाकडे जाणाऱ्या वाहणांची मोठया प्रमाणात वर्दळ नेहमी सुरु असते. सदर रस्त्यात पडलेल्या खड्यांमुळे वाहनधारकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत होती, त्यामुळे नागरिक आणि वाहनधारकांत तीव्र नाराजी होती.गणपती आगमन याच मार्गांवरून होत असते त्यामुळे आज दि.27ऑगष्ट 2025 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग शाहूवाडी यांचेकडून खड्यांमध्ये मुरूम टाकून तात्पुरते खड्डे मुजवण्यात आले आहेत.
*सदरचे खड्डे जरी तात्पुरते मुजवले असले तरी, वाहणांची वर्दळ असणारा मुख्य रहदारीचा रस्ता असल्याने दुरुस्ती करून पक्का रस्ता होणे गरजेचे आहे*

