पशुधन पर्यवेक्षक पदाच्या रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात…वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पदवीधर संघटना
वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदवीधर संघटनेमार्फत पशुसंवर्धन विभाग पुनर्रचनेनंतरच्या पशुधन पर्यवेक्षक पदाच्या रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात यासंदर्भात माननीय आमदार जयंतराव पाटील यांना निवेदन देण्यात आले.
शासन निर्णय प.सं.प्र. 2024/प्र.क्र.01 प दु म 1 नुसार महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग यांची पुनर्रचना झाली असून त्या अनुषंगाने विभागाचे कार्यक्षेत्र, जबाबदाऱ्या व सेवा व्याप्ती वाढलेली आहे. तथापि पुनर्रचनेनुसार आवश्यक असलेली पशुधन पर्यवेक्षक रिक्त पदे 3772 इतकी असून ही पदे अद्याप भरली गेलेली नाहीत.

पशुधन पर्यवेक्षक हे पद ग्रामीण भागातील पशुपालक शेतकरी तसेच शासनाच्या पशुसंवर्धन योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सदर पदाची भरती अपुरी राहिल्यास विभागाच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होऊन योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होऊ शकणार नाही. त्यामुळे ही पदे लवकरात लवकर आयबीपीएस वा एमपीएससी मार्फत भरण्यात यावीत यासंदर्भातील निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदवीधर संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल सूर्यवंशी, वाळवा तालुका अध्यक्ष अभिजीत शिंदे व डॉ. चिंतामणी निकम यांनी माननीय आमदार जयंतराव पाटील यांना दिले.
यावेळी सदर पदाची तयारी करणारे विद्यार्थीही उपस्थित होते.

