“वुमेन्स आयकॉन 2025” पुरस्काराने सौ. रुपाली खंडेराव जाधव सन्मानित…! मा. जयंत पाटील व मा. सौ. रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते गौरव
इस्लामपूर – :
समाजसेवा, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक परिवर्तनासाठी झटणाऱ्या सौ. रुपाली खंडेराव जाधव यांना दैनिक लोकमत तर्फे देण्यात येणारा “वुमेन्स आयकॉन 2025” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला असून, पुरस्काराचे वितरण आमदार मा. जयंत पाटील (साहेब) आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. सौ. रुपालीताई चाकणकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सौ. जाधव यांनी आपल्या कार्यातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्यापासून ते सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग यामुळे त्यांची कामगिरी अत्यंत उल्लेखनीय ठरली आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेत “लोकमत” समूहाने “वुमेन्स आयकॉन 2025” या पुरस्काराने त्यांचा गौरव केला आहे.
या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सौ. जाधव यांनी मिळालेला सन्मान हा संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले.

