ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

वारणा धरणातून होणारा विसर्ग कमी करून 15369 ने सुरु,वारणेचा पुर हळूहळू ओसरू लागला, पाण्याखाली गेलेले पूल आणि रस्ते येत्या काही तासात वाहतुकीसाठी खुले होण्याची शक्यता


*वारणा धरणातून होणारा विसर्ग कमी करून 15369 ने सुरु,वारणेचा पुर हळूहळू ओसरू लागला, पाण्याखाली गेलेले पूल आणि रस्ते येत्या काही तासात वाहतुकीसाठी खुले होण्याची शक्यता*

शित्तूर – वारुण ( शिवाजी नांगरे) वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टीची तीव्रता थोड्या प्रमाणात कमी झाल्याने जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता धरणातून दिनांक 21/08/2025 रोजी सकाळी 7.00 वाजता वक्र द्वाराद्वारे सुरू असणारा 22460 क्युसेक्स विसर्ग कमी करून तो 13739

क्युसेक करण्यात आला आहे व विद्युत गृहातून 1630 क्युसेक असा एकूण 15369 क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. धरणातून येणारा पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने वारणेचा पूर हळू – हळू ओसरू लागला आहे. पुराचे पाणी कमी होत जाईल तसे पाण्याखाली गेलेले पूल आणि रस्ते येत्या काही तासात वाहतुकीसाठी खुले होऊन दळण – वळण पूर्ववत होण्याची शक्यता आहे. तरीही पुन्हा पावसाचा जोर वाढल्यास आणि धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्गात वाढ करण्यात येईल.

तरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनाकडून देणेत आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *