आण्णासाहेब डांगे यांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण भेट; सम्राटबाबा महाडिक यांच्या नेतृत्वात भाजपला जिल्ह्यात नवे बळ
मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्र चव्हाण यांची माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांनी भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर भेट घेतली. या वेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, भाजप सांगली जिल्हाध्यक्ष सम्राटबाबा महाडिक, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, माजी आमदार भगवानराव साळुंखे व माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे हे उपस्थित होते.
या बैठकीत डांगे यांच्या भाजप प्रवेशावर सविस्तर चर्चा झाली. सांगली जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची घडी अधिक मजबूत करण्याचे कार्य सम्राटबाबा महाडिक यांच्या नेतृत्वात गत काही काळापासून प्रभावीपणे सुरू आहे. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे पक्षात विविध भागांतील अनुभवी नेते व कार्यकर्त्यांचा ओघ वाढला आहे.
आण्णासाहेब डांगे यांचा संभाव्य प्रवेश ही या प्रक्रियेतील एक महत्त्वपूर्ण घडामोड ठरणार असून, वाळवा तालुक्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

