वारणा धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्यामुळे नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
शित्तूर – वारुण ( शिवाजी नांगरे) वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यामुळे जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता धरणातून दिनांक 27/09/2025 रोजी दुपारी 1.00 वाजता वक्र द्वाराद्वारे 3479 क्युसेक विसर्ग व विद्युत गृहातून 1630 क्युसेक असा एकूण 5109 क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.पावसाचा जोर वाढून धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यास सदरच्या विसर्गामध्ये वाढ होऊ शकते, त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहण्याचा इशारा वारणा धरण प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

