ताज्या घडामोडीमहाराष्ट्रशिक्षण

शिराळा तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार स्व. वसंतराव नाईक (बाबा ) यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली


शिराळा : प्रतिनिधी

शिवभवानी ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था, सोमवार पेठ, शिराळा येथे प. पू. स्वामी विवेकानंद सेवाश्रम संस्थेचे आधारवड, शिराळा तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार स्व. वसंतराव नाईक (बाबा ) यांची जयंती कै. माजी आमदार वसंतराव नाईक बाबा स्मुर्ती प्रतिष्ठान शिराळा च्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष ऍड. भगतसिंग नाईक, हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील माने, शिराळाचे आम. सत्यजित देशमुख, सांगली जिल्हा भाजप अध्यक्ष सम्राट महाडिक, शिवसेनेचे गौरव नाईकवडी, संस्थेचे सचिव विश्वप्रतापसिंग नाईक, उपाध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक, डब्बल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या हस्ते माजी आम. स्व. वसंतराव नाईक (बाबा )

यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.

माझी आम. कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती औचित्य साधून शिवभवानी ग्रामीण बिगर शेती सह. पत संस्थेचे उदघाटन मान्यवारांचे हस्ते करण्यात आले

कै. वसंतराव नाईक बाबा स्मुर्ती प्रतिष्ठानच्या वतीने शिराळा तालुक्याचे भाग्यविधाते माजी. आम. कै. वसंतराव नाईक बाबा यांच्या ९३ व्या. जयंती निमित्त पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये राहुल पाटील(IFS) – नागभूमी भूषण पुरस्कार, श्री. शिवाजी सिदू यादव – जीवन गौरव पुरस्कार, डॉ. दिलावर जमादार – आदर्श शिक्षक पुरस्कार, श्री. प्रकाश कुंभार – गुणवंत सेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

आपल्या मनोगतातून खास. धैर्यशील माने यांनी माजी. आम. स्व. वसंतराव नाईक बाबा यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला. बाबांनी राजकारण, शिक्षण व सहकार या तिन्ही क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली. शेतकरी व दलित समाजावर माजी. आम. स्व.वसंतराव नाईक बाबा यांचे अपार प्रेम होते त्यांनी ते कृतीतून सिद्ध केले. असे विचार खास. धैर्यशील माने यांनी मांडले.

संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक म्हणाले, बाबांनी लावलेले रोप वाढविण्याचे काम नानांनी केले. राजकारण फसवण्यासाठी करायचे नसते तर समाजकार्य करण्यासाठी करायचे असते.

आम.सत्यजित देशमुख म्हणाले, भविष्य काळात नवी पिढी निर्माण करणारी तरुण वर्ग पृथ्वीसिंग बाबा यांच्या सारखा तयार झाला पाहिजे. आता येणाऱ्या काळात विचार आणि विकासाची दिवाळी साजरी करूया.

प्रमुख पाहुणे गणेश शिंदे म्हणाले, शिवभवानी पतसंस्थेच्या मध्यमातून नवं उद्योजक निर्माण करा. जास्तीत जास्त कर्ज वाटप करून लोकांच्या हाताला काम द्या.

यावेळी ऍड. भगतसिंग नाईक, सम्राट महाडिक,गौरव नाईकवडी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी सौ. नलिनी नाईक,वैशाली कदम, अर्चना कदम, सौ. नम्रता नाईक, सौ. कश्मिरा नाईक,दुर्गा पाटील सत्यजित नाईक, विश्वास कदम,सनी पाटील, उदयसिंह पाटील, प्रा. राजसिंह पाटील, के. डी. पाटील, माजी सभापती हणमंत पाटील, महादेव कदम, बी. एस. पाटील, विक्रम पाटील, दिलीप घाटगे, आबा खबाले, रफिक अत्तार, एस. एम. पाटील, सचिन शेटे, सारिका पाटील, महेश पाटील, निलेश आवटे, उत्तम निकम इत्यादी शिराळा वाळवा तालुक्यातील बाबा प्रेमी मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र बनसोडे, विविध शाखेचे प्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *