राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे येळापूर येथे रास्ता रोको आंदोलन : रणधीर नाईक व विराज नाईक यांनी केले नेतृत्व
*राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे येळापूर येथे रास्ता रोको आंदोलन : रणधीर नाईक व विराज नाईक यांनी केले नेतृत्व*
*गतिरोधकासाठी आठवड्याची मुदत : अन्यथा तिव्र आंदोलनाचा इशारा. ठेकेदार व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा.*
शिराळा /प्रतिनिधी -:
कराड-मलकापूर राज्य मार्गावरील मेणी फाटा ते वारणा नदीपर्यंत अपघात प्रवण क्षेत्रात तातडीने गतिरोधक (स्पीड ब्रेकर) व रमलर बसवावेत म्हणून गेल्या वर्ष भरापासून वारंवार आंदोलने, निवेदन देऊनही कोणतीच ठोस कार्यवाह झालेली नाही. अपघाताचे सत्र मात्र सुरूच आहे. यामध्ये काही लोकांचा जीव गेला आहे. काही लोकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. या बाबत मार्ग प्रकल्प उपविभाग सातारच्या अधिकाऱ्यांनी तहसीलदारांसमोर लेखी देऊनही कोणतीच कार्यवाही केलेली नाही. म्हणून पदाधिकारी व या परिसरातील गावातील नागरिकांना सोबत घेवून कुदळ फावड्यासह हा रस्ता उकरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मार्फत आज आंदोलन झाले. त्याचे नेतृत्व यशवंत ग्लुकोज कारखान्याचे अध्यक्ष रणधीर नाईक,विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक यांनी केले.
येळापूर (ता. शिराळा) येथील बस थांब्याजवळ रास्ता रोको करण्यात आला. प्रास्ताविक सौरभ पाटील यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. के. नायकवडी, आनंदराव पाटील, रणधीर नाईक, विराज नाईक यांची भाषणे झाली. रास्ता रोको वेळी मार्ग प्रकल्प उपविभाग सातारा संबंधित विभागाचे डेप्युटी इंजिनिअर रोशन भोसले हे अधिकारी उपस्थित होते. अधिकारी अधिकारी श्री. ढेरे यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्यात आला. त्यांना आठवड्याची येत्या सोमवार पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत गतिरोधक (स्पीड ब्रेकर / रमलर) बसविण्यास प्रारंभ करावा, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. तसेच कोकरूड पोलिस ठाण्याने अपघात होऊन ज्या पाच जणांचा जीव गेला आहे त्यांच्या मृत्यूस रस्त्याचा ठेकेदार व मार्ग प्रकल्प अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी, असे लेखी निवेदन देण्यात आले.

यावेळी संचालक शिवाजी पाटील व संभाजी पाटील, जिल्हा परिषद सदस्य शंकर मोहिते, पंचायत समिती सदस्य वसंत पाटील, कोंडिबा चौगुले, पै. शिवाजी लाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष आनंदराव पाटील, विनोद पन्हाळकर, सरपंच प्रमोद पाटील, विजय पाटील, सरपंच तानाजी पाटील, राजू खांडेकर, डॉ. एस. टी. पाटील, बजरंग वाघमारे, संदीप चोरगे, तुकाराम सावंत, पांडुरंग गायकवाड, आनंदा पाटील, किसन आटुगडे, आय्याज मोकाशी, बाबूराव वडकर, सुनील पाटील, मोहन पाटील, अविनाश पाटील, चंद्रकांत पाटील, सचिन चव्हाण, अक्षय कडोले, कुमार कडोली, पांडुरंग गायकवाड, संभाजी पाटील,अभिषेक जामदार, डॉ प्रकाश मकामले उद्योजक बळीराम पाटील, संजय पाटील,राजू पाटील,नितीन ढेरे दिलीप सूर्यवंशी, विकास शिरसट संदीप चोरगे,शिवाजी पाटील धनाजी सावंत सागर सावंत,सुरेश जाधव, तानाजी पाटील, गणेश पाटील,नथुराम कोळवणकर, राजू पाटील,हमीद नाईकवाडी,राम नाईकवडी,गवळेवाडी माजी संरपंच बाबासो गोळे, हाप्पेवाडी उपसरपंच सुनील हाप्पे व येळापूर खोऱ्यातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

