ऐन गणेशोत्सवाच्या काळात शित्तूर – वारुण येथे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण – नागरिकांतून तीव्र नाराजी
शित्तूर – वारुण (शिवाजी नांगरे) शित्तूर – वारुण येथील नळ- पाणी पुरवठा योजनेचा बोजवारा, तब्ब्ल 12 ते 13 दिवस पाणीपुरवठा बंद. ऐन सणासुदीच्या मोक्यात पिण्याच्या पाण्यासाठी शोधावे लागताहेत पारंपरिक पाणवठे.
ऐन सणासुदीच्या, गणेश उत्सवाच्या काळात शित्तूर – वारुण गावातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. कधी लिकेज,मोटार पंपात बिघाड तर कधी विजेची समस्या अशा या- ना,त्या कारणाने नेहमीच आठ ते पंधरा दिवस बंद होणारा पाणीपुरवठा गणपती उत्सवाच्या मोक्यात मोटार पंपातील बिघाडामुळे बंद असल्याचे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून समजते.गेली 12 ते 13 दिवस पाणीपुरवठा बंद असल्यामुळे गावातील नागरिकांना नदी, ओढे, झरे अशा ठिकाणी जाऊन पिण्याचे पाणी आणावे लागत आहे.हि नेहमीच उद्भवणारी समस्या कायमची कधी मिटणार?
*उत्सवाच्या काळात माता भगिनी डोक्यावर, कडेवर पाण्याच्या घागरी -हांडे घेऊन पाणी भरत आहेत त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाबाबत ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे. गेली अनेक दिवस गावाला भेडसावणारी हि पाण्याची समस्या कधी दूर होणार?याला जबाबदार कोण? राजकीय अनास्था? कि प्रशासन?असे अनेक प्रश्न जनतेतून विचारले जात आहेत*.

