ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीय

शित्तूर – वारुण च्या सौं. प्रियांका भोसले शाहूवाडी च्या सभापती पदी विराजमान तर उपसभापती अमर खोत यांची निवड.


शित्तूर – वारुण (शिवाजी नांगरे) शाहूवाडी पंचायत समितीच्या सभापती पदी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या सौं. प्रियांका तानाजी भोसले यांची तर उपसभापती पदी श्री. अमर नारायण खोत यांची निवड करण्यात आली.शाहूवाडी तालुक्यात दोन्ही गटांना सम – समान बलाबल झाल्यामुळे सत्ता कोणाची? असा पेच निर्माण झाला होता, यावेळी चीट्या टाकून ही निवड करण्यात आली, दरम्यान शाहूवाडी पंचायत समितीवर वर्चस्व राखण्यात आम. विनय कोरे -कर्णसिंह गायकवाड गटाला यश मिळाले.

शाहूवाडी तालुक्यातील पंचायत समिती- जिल्हा परिषद निवडणुकीत कोरे -गायकवाड युती आणि पाटील -गायकवाड युती यांच्यात प्रमुख लढत झाली होती. यावेळी तालुक्यातील जनतेने दोन्ही गटांना सम – समान जागा मिळाल्याने पंचायत समिती सभापती पदासाठी संभ्रमावस्था निर्माण झाली होती. सभापती पद हे सर्वसाधारण महिला वर्गासाठी खुले होते. शित्तूर – वारुण पंचायत समिती मतदार संघातून निवडून आलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या सौं. प्रियांका तानाजी भोसले यांची कोरे – गायकवाड गटातून सभापती पदासाठी वर्णी लागणार हे जवळपास निश्चित होते, आज सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत चीट्टी टाकून सभापती पदाची निवड करण्यात आली. यावेळी सौं. प्रियांका तानाजी भोसले यांची सभापती तर श्री. अमर नारायण खोत यांची उपसभापती पदी निवड करण्यात आली.शाहूवाडी तालुक्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच शित्तूर – वारुण गावाला सभापती पदावर विराजमान होण्याचा मान मिळाल्याने शित्तूर – वारुण परिसरातुन प्रियांका भोसले यांचे अभिनंदन केले जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *