*कन्याशाळा शिराळा*
*तालुक्यातील सर्वात सुंदर शाळा*
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियाना अंतर्गत संपन्न झालेल्या *तालुकास्तरीय माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत हाय्यर एज्युकेशन सोसायटी संचलित ‘कन्या शाळा शिराळा’ने प्रथम क्रमांक प्राप्त करून संपूर्ण शिराळा तालुक्यातून सुंदर शाळेचा बहुमान पटकवणारी एकमेव शाळा* ठरली आहे.
*||न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते || या ध्येयाने प्रेरित हाय्यर एज्युकेशन सोसायटी संचलित कन्या शाळा शिराळा ची स्थापना 1984 साली झाली. इयत्ता पाचवी ते बारावी (कला) पर्यंत पंचक्रोशीतील सर्व खेडेगावातून विद्यार्थिनी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. ही कन्या शाळा शिराळा सर्व भौतिक सुविधांनी सुसज्ज इमारत, प्रशस्त डिजिटल वर्गखोल्या , सर्व विद्यार्थिनींना *पिण्यासाठी RO चे फिल्टर पाणी, तालुक्यामध्ये एकमेव मुलींच्यासाठी एनसीसी व कराटेचे प्रशिक्षण देणारी एकमेव शाळा*, तसेच विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी *वाड॒मय मंडळ, क्रीडा मंडळ, विज्ञान मंडळ, सांस्कृतिक विभाग, परीक्षा विभाग,वक्तृत्व विभाग, कला विभाग इत्यादी या मंडळातील शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे ग्रामीण भागातल्या बऱ्याच माजी विद्यार्थिनी सरकारी अधिकारी डॉक्टर्स , आणि. इंजिनियर्स म्हणून काम* पाहत आहेत.सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी, ,प्रशस्त मैदान, तन्मयतेने अध्यापन करणारे तज्ज्ञ अध्यापक वर्ग व शिक्षकेतर सेवक वर्ग,शिस्तप्रिय विद्यार्थिनी, निसर्ग संपन्न हिरवाईने नटलेला परिसर या वैशिष्ट्यांच्या जोरावर अभियानाचे सर्व निकष पार करत कन्याशाळा शिराळाने संपूर्ण तालुक्यातून माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक संपादित करून संस्थेचा नावलौकिक वाढवला.
*कन्या शाळा ,शिराळा या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरदेसाई मॅडम, पर्यवेक्षक एस. टी. कुंभार सर यांचे मार्गदर्शनानुसार विद्यालयातील सर्व अध्यापकांनी अत्यंत तन्मयतेने काम करून विद्यालयास तालुक्यातून*🥈”*प्रथम क्रमांक ” 🔹पटकावण्याचा बहुमान प्राप्त करून दिला, म्हणून सर्व स्तरातून विद्यालयावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. *हाय्यर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माननीय श्री आर.व्ही हसबनीस सर, सचिव मा.श्री दिगवडेकर सर ,सहसचिव श्री .मा.प्रकाश नवांगुळ सर,ज्येष्ठ संचालक माननीय प्रदीप हसबनीस व सर्व संचालक., तसेच शाळा समितीच्या अध्यक्षा आणि सर्व सदस्य आणि पंचायत समितीचे मा. गटविकास अधिकारी , गटशिक्षणाधिकारी ,विस्तार अधिकारी , शिराळा केंद्राचे केंद्रप्रमुख व आमचे मार्गदर्शक माननीय श्री. सुहास रोकडे साहेब आणि सर्व केंद्राचे केंद्रप्रमुख व आमच्या बीआरसी मधील सर्व तज्ज्ञ मार्गदर्शक तसेच शिराळा पंचक्रोशीतील सर्व पालक वर्ग* व *माजी शिक्षक -शिक्षिका ,माजी विद्यार्थिनी* यांनी या यशाबद्दल विद्यालयाचे कौतुक केले. व कन्याशाळेच्या या यशाबद्दल अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या💐💐💐💐👍👍👍👍✌️✌️✌️👆👆👆👆👆


