भारतीय शेयर बाजाराची जोरदार उसळी
भारतीय शेयर बाजाराची जोरदार उसळी
दिनांक १७ जुलै २०२६
शुक्रवारी, देशांतर्गत बाजारात दिवसाच्या सुरुवातीपासूनच सकारात्मक व्यवहार होताना दिसत आहेत. बाजाराच्या तेजीत सर्वच क्षेत्रीय निर्देशांकात खरेदी दिसून आली असून फायनान्शिअल सर्व्हिसेस, आयटी, मेटल, फार्मा स्टॉक्स 1 टक्क्यांहून जास्त वाढ झाली. सेन्सेक्स सुमारे ९६४ अंकांनी वाढून ७८१५१ वर आणि निफ्टी २६१ अंकाच्या वाढीसह २४३३४ वर बंद झाला.
जियो फायनान्शियल ५ टक्क्यांच्या मोठ्या वाढीसह इंडेक्सचा टॉप गेनर ठरला.कोटक महिंद्रा बँक जून तिमाहीच्या (Q1) चांगल्या निकालांच्या अपेक्षेमुळे या शेअरमध्ये मोठी खरेदी झाली. आयसीआयसीआय बँक या प्रायव्हेट बँकेच्या शेअर्सनेही उत्कृष्ट कामगिरी केली.

