ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रसामाजिक


पृथ्वीसिंग नाईक यांनी अनाथ मुलांना दिली मायेची उब !

 

शिराळा : प्रतिनिधी

 

एखादी व्यक्ती मोठ्या पदावर असला तरी त्याचा सामाजिक जीवनात एक दरारा असतो. त्यातील काहीजण सामाजिक दायित्व अंगिकारून समाज जीवनात सर्वसामान्यांमध्ये मिसळून काम करून सहृदयतेची भावना ठेवणारे मोजकेच असतात. सामाजिक दायित्व पार पाडण्यात सदोदित अग्रक्रमावर राहणारे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष व युवा नेता मा. पृथ्वीसिंग नाईक (बाबा ) त्या पैकी एक. अनाथ मुलांसोबत सहभागी होऊन त्यांना मायेची ऊब दिली.

माधुरी जालिंदर लोहार इयत्ता ९ वी, आदित्य महादेव पाटील इयत्ता ९ वी, शुभ्रा राहुल गुरव इयत्ता ६ वी, राज गणपती वाळवेकर इयत्ता ५ वी या अनाथ बालकांना बालसंगोपन पेन्शन २२५० प्रमाणे प्रति महिना सुरु करून दिली. या निरागस अनाथ मुलाशी हितगुज साधून त्या मुलांची आपबीती ऐकली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. स्वतःला अनाथ समजू नका. तुमच्या सोबत आम्ही आहोत. संकटाला घाबरू नका. माणसाचे जीवन घडविण्याचे काम फक्त शिक्षणच करते. अर्ध्यावर शिक्षण सोडू नका उच्च ध्येय बाळगा असे सांगून अनाथ बालकांना धीर दिला.

पुढे नाईक म्हणाले, छाया बाबूराव पाटील रा. कणदूर येथील रहिवाशी असलेल्या सण २०१९ साली प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत सदर लाभार्थीला लाभ मिळाला होता. परंतु हा लाभ केवळ कागदोपत्रीच राहिला होता. मिळालेल्या लाभाचे साहित्य एजंट याने गायब केले होते. या गोष्टी चा पाठपुरावा करून त्या लाभार्थी ला गॅस कनेक्शन मिळवून दिले. या कामी खास. धैर्यशील माने, गौरव नाईकवडी, शिराळा महिला आघाडी प्रमुख सारिका पाटील यांचे ही मार्गदर्शन मिळाले.

यावेळी प्रा. राजसिंह पाटील, प्रवीण गायकवाड, राज पठाण, यश गरगटे, आधी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *