वारणा धरणातून होणाऱ्या विसर्गात वाढ करून 5:30 वाजता 6900 ने सुरु करण्यात येणार
वारणा धरणातून होणाऱ्या विसर्गात वाढ करून 5:30 वाजता 6900 ने सुरु करण्यात येणार
शित्तूर – वारुण ( शिवाजी नांगरे) वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून वारणा धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता धरणातून दिनांक 28/07/2026 रोजी दुपारी 5:30 वाजता वक्र द्वाराद्वारे सुरू असणारा 3700 क्युसेक्स विसर्गा मध्ये वाढ करून तो 5500 क्युसेक करण्यात येणार आहे व विद्युत गृहातून 1400 क्यूसेक्स असा एकूण 6900 क्यूसेक्स विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. पाउस चालू/वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्गात वाढ करण्यात येईल.
तरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा वारणा धरण प्रशासनाकडून देणेत आला आहे.

