ब्रेकिंग न्यूजसामाजिक

वाढदिवस सर्वसामान्य कार्यकर्ता ते असामान्य नेतृत्वाचा


*वाढदिवस सर्वसामान्य कार्यकर्ता ते असामान्य नेतृत्वाचा*

 

शित्तूर – वारुण ( शिवाजी नांगरे) येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रकाश यशवंत मगदूम यांचा आज दि.6 नोव्हेंबर रोजी वाढदिवस!

शित्तूर वारुण येथील रहिवाशी असलेले प्रकाश मगदूम हे गेली वीस – पंचवीस वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अग्रेसर असे व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत. सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकशाही मार्गाने परिणामी मोर्चा, आंदोलन आणि उपोषणाच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य सर्वदूर परिचित आहे.शित्तूर- वारुण चे ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी संघटनेचे सक्रिय लढावू कार्यकर्ता ते स्वाभिमानीचे लढवय्या नेतृत्व अशी त्यांची दमदार राजकीय कारकीर्द असल्याचे दिसून येते. सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना गावातील बहुजन वर्गाचे फार मोठे,*शिव शाहू बहुजन सेवा संघ* नावाचे संघटन उभारण्यात त्यांना यश आले होते. शेतकरी संघटनेचे नेते भाई भारत पाटील यांच्या नेतृत्वात त्यांनी अनेक आंदोलने यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत.शित्तूर- आरळा अपूर्ण पुलाच्या पूर्णतेसाठी केलेले वारणा नदीतील *जलबुडी* आंदोलन सर्वाना परिचित आहे. शेतकऱ्यांच्या ऊसदर प्रश्नावर संपूर्ण महाराष्ट्रभर राजू शेट्टी यांच्या अनेक आंदोलनात त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे.तसेच गावातील अनेक गरजू लाभार्थ्यांना राजीव गांधी योजना, श्रावणबाळ योजना, अपंग लोकांच्यासाठीच्या योजना अशा अनेक शासकीय योजनाचा लाभ मिळवून दिला आहे. अशा सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्ता ते असामान्य नेतृत्वाला *भारत 24 अपडेट कडून जन्मदिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा*…! 🌹🌹🌹


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *