ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

जिल्हास्तरीय कार्यशाळेत यामध्ये समाज सेविका प्रेमाlला ताई साळी यांचे एकल महिलांच्या असणारे ज्वलंत प्रश्नाविषयी व त्यांच्या असणाऱ्या मागण्याविषयी मार्गदर्शन


महाराष्ट्र शासन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सांगली अंतर्गत एकल महिला धोरण निश्चित करण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होते यामध्ये समाज सेविका प्रेमाlला ताई साळी यांनी एकल महिलांच्या असणारे ज्वलंत प्रश्नाविषयी व त्यांच्या असणाऱ्या मागण्याविषयी मार्गदर्शन केले . या महिलांचे ज्वलंत प्रश्न म्हणजे पती निधनानंतर येणाऱ्या आर्थिक अडचणी यामध्ये मुलांचे पालन पोषण शिक्षण निवाऱ्याची सोय व मिळेल तो रोजगार यामध्ये उदरनिर्वाह करणे तसेच विधवा म्हणून समाजा मधून होणारी मानहानी व तिला कोणत्याही कार्यक्रमांमध्ये हळदी कुंकवाचा मान न देणे बाजूला थांबवणे, पती निधनानंतर तिला वारस न करता घरातून बाहेर काढणे, मारहाण करणे अशा अनेक ज्वलंत समस्या शासकीय अधिकाऱ्यांच्या समोर मांडल्या आणि यावरती प्रमुख मागण्या केल्या त्या म्हणजे 1) पती निधनानंतर एक महिनाभरातच त्याच्या पत्नीचे व मुलांची नावे वारस म्हणून लावून मिळावेत घर किंवा शेत यावर 2) एकल महिलांचे स्वतंत्र बचत गट तयार करून त्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन मशनरी घेण्याकरिता त्यांना विनातारण बिनव्याजी कर्ज द्यावे त्यामुळे त्या स्वावलंबी बनतील 3) या महिलांच्या मुलांना उच्च शिक्षणामध्ये दहा टक्के राखीव जागा ठेवून त्यांची फी माफ करावे 4) पेन्शनर लोकांचे ज्याप्रमाणे एक तारखेला पेन्शन होते त्याचप्रमाणे बाल संगोपन , संजय गांधी निराधार वृद्धापकाळ योजना दिव्यांग योजना यांचीही पेन्शन योजना एक तारखेला त्यांच्या खात्यात जमा व्हावी.5) संजय गांधी व वृद्धापकाळ निराधार योजनेचे प्रति महिना पाच हजार रुपये मिळावेत 6) एकल महिलांच्या साठी किंवा मुलांच्यासाठी व वृद्धांसाठी शासनाच्या ज्या काही शासकीय योजना असतील त्यांची कागदपत्रे सुलभ पणे काढता यावीत याकरिता एक खिडकी योजना या करावी. 7) याकरिता प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत मध्ये तसेच महानगरपालिकेमध्ये या योजना एक खिडकी योजना मधून सुरू करावी 8) शासनाच्या ज्या काही कर्ज योजना आहेत त्यांच्या अटी या महिलांसाठी शिथिल कराव्यात तसेच त्यांनी तयार केलेल प्रोडक्शन याला दर्जेदार पॅकेजिंग करण्याच ट्रेनिंग देण्यात यावे 9 )या महिलांनी तयार केलेले प्रोडक्शन तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी मॉल स्वरूपात विक्रीस ठेवण्यात यावे व त्याला बाजारपेठ निर्माण करून द्यावे .10) ग्रामीण भागातील महिलांसाठी शासकीय जमीन बचत गटांना करावे असल्याने त्यामध्ये शेळीपालन पशुपालन गाय म्हैस पालन हे जोडधंदे दिल्याने त्यांना उत्पन्नाचे साधन चांगले मिळेल याकरिता त्यांना त्वरित पशुधन द्यावे. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी माननीय कणूचे मॅडम , जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी मा. वर्षा पाटील मॅडम तसेच इतर शासकीय अधिकारी व एकल महिला उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *