शिवशाही फाऊंडेशन ,भारत तर्फे धुळे जिल्ह्यातील आदिवासी विविध शाळेत ‘स्कूल चले हम’ व ‘शाळा तेथे वाचनालय’ अभियानात 500 विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप
शिवशाही फाऊंडेशन ,भारत तर्फे धुळे जिल्ह्यातील आदिवासी विविध शाळेत ‘स्कूल चले हम’ व ‘शाळा तेथे वाचनालय’ अभियानात 500 विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले!!

आज ‘स्कूल चले हम’ या अभियान धुळे जिल्ह्यातील विविध आदिवासी पाड्यातील शाळेतील सर्व विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप वाटप करण्यात आले.तसेच शाळा तेथे वाचनालय या अभियान अंतर्गत छ.शिवाजी महाराज,शाहू-फुले-आंबेडकर,गांधीजी तसेच क्रांतिकारी व समाजसुधारक,प्रेरणादायी पुस्तकांचा संच व खेळाचे साहित्य व खाऊ देण्यातआला. महाराष्ट्रात विविध जिल्ह्यातील आदिवासी ,झोपडपट्टी,डोंगराळ, दुर्गम भागात संस्थेतर्फ शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक /राष्ट्रीय अध्यक्ष बाळाराम माडकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ श्रीकारा गौंडा,प्रदेश अध्यक्ष सुहास सपाटे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ सुहास सपाटे, तालुका अध्यक्ष भरत गायकवाड हजर होते.त्यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. प्रदेश उपाध्यक्ष डॉ रंजन गावीत व धुळे जिल्हाध्यक्ष श्री.निखिल गौड यांनी संस्थेची माहिती दिली. ‘स्कूल चले हम’ अभियान 26 जून ते 15 ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत 3000 विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे.मागील ७ दिवसांपासून धुळे जिल्ह्य़ातील आदिवासी व गरजू व गरीब 500 विद्यार्थीना साहित्य वाटप करण्यात आले.तसेच जिल्हा परिषद शाळा छडवेल,मालचंद पाडा,बरडीपाडा, परखूणपाडा,कोकले, पुण्याचा पाडा,पाचमौली,शाळेत ‘शाळा तेथे वाचनालय’ हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष डॉ.सुहास सपाटे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ रंजन गावीत व ऋषिकेश पाटील, प्रदेश प्रतिक कोडूलकर व ऋतुराज पाटील धुळे जिल्हाध्यक्ष निखिल गौड, तालुका अध्यक्ष भरत गायकवाड तसेच विविध शाळेचे मुख्याध्यापक, कांबळे सर,साकोरे, केंद्र प्रमुख मा.सुभाष मोहिते सर,प्राचार्य शेवाळे सर , नाद्रे सर ,खैरनार सर ,चव्हाण सर, महिरे सर, उपस्थित होते.या अभियानात खजिनदार प्रतिक कोडूलकर,सचिव योगेश पाटील , सारंग कुलकर्णी,डॉ.शंशाक कुलकर्णी, अजित/पंकज मस्कर,विशाल भानुसे,सचिन पाटील, ऋतुराज पाटील, जिल्हा प्रमूख व इतर पदाधिकारी याचा मोठा सहभाग व या अभियानात विशेष सहकार्य महाराष्ट्राचे युवा नेते अनुप दादा मोरे ,IPS मा.श्रीकांत धिवरे ,IRS विजयसिंह,PI दिपक वळवी, डॉ विशाल वळवी , डॉ . मूलचंद सिंह,सुनिल करांडे,आशिष गुप्ता, राजेंद्र शर्मा यांचे मार्गदर्शन लाभत आहे..

