ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शित्तूर – वारुण येथील युवा नेतृत्व रवींद्र हणमंत पाटील यांचा आज वाढदिवस त्या निमित्ताने…


सर्वसामान्य जनतेच्या मनातला आवाज युवा नेतृत्व… रवींद्र पाटील

 

शित्तूर – वारुण (शिवाजी नांगरे) शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर – वारुण येथील युवा नेतृत्व रवींद्र हणमंत पाटील यांचा आज वाढदिवस त्या निमित्ताने…

 

शित्तूर – वारुण येथील एका शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या रवींद्र यांना शालेय जीवनापासूनच समाजकार्याची आवड होती. शालेय शिक्षण पूर्ण होताच त्यांनी राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत काम करण्यास सुरुवात केली. पक्षाच्या विविध आंदोलनातून सहभागी होत, अन्याया विरुद्ध लढण्याची आणि गोर – गरीब, सर्वसामान्य लोकांच्या अडी – अडचणी समजून घेत त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. शाहूवाडी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून शित्तूर – वारुण येथे शाखा सुरु केली. पुढे उदरनिर्वाहासाठी शहरात काम करत असूनही गावातील समस्या सोडवण्याचा धडाकाच सुरु केला. गावातील वीज, पाणी, नालेसफाई, रस्तेदुरुस्ती अशा अनेक प्रश्नावर प्रभाविपणे काम करण्यास सुरुवात केली. पक्षाच्या माध्यमातून तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून तर कधी स्वतः भेटून निवेदने देऊन अनेक वर्ष प्रलंबित असणारी लोकांची कामे विनामूल्य करून दिली. महावितरण कंपनीचे धोकादायक विद्युत खांब आणि विजवाहक तारा बदलण्याचे महत्वपूर्ण काम केले आणि भविष्यात होणारी जीवितहानी टाळली. कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना सुद्धा एका सर्वसामान्य कुटुंबातील राजसाहेब ठाकरेंचा हा शिलेदार सर्वसामान्य लोकांसाठी कार्यरत असल्यामुळे लोकांमधून समाधान व्यक्त होत आहे. अशा कर्तव्यदक्ष युवा नेतृत्वास *जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा*….!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *