वारणा धरणातून होणारा विसर्ग कमी करून 24090ने सुरु, पुरस्थिती हळूहळू ओसरू लागणार
वारणा धरणातून होणारा विसर्ग कमी करून 24090ने सुरु, पुरस्थिती हळूहळू ओसरू लागणार
शित्तूर – वारुण (उपसंपादक शिवाजी नांगरे) वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टीची तीव्रता थोड्या प्रमाणात कमी झाल्याने जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता धरणातून दिनांक 20/08/2025 रोजी रात्री 10.00 वाजता वक्र द्वाराद्वारे सुरू असणारा 28177 क्युसेक्स विसर्ग कमी करून तो 22460 क्युसेक करण्यात आला आहे व विद्युत गृहातून 1630 क्युसेक असा एकूण 24090क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. पाउस चालू/वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्गात वाढ करण्यात येईल.
तरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनाकडून देणेत आला आहे.

