गुंडेवाडी तालुका मिरज येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक शांततेत पार.
गुंडेवाडी तालुका मिरज येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक शांततेत पार.

सांगली जिल्हा विभागीय उपसंपादक अशोक मासाळ
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील गुंडेवाडी येथे 2026 सालाच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान मतदानुकीचे मतदान शांततेत व सुरळीत पार पडले गावातील सर्व मतदान केंद्रावर सकाळपासून मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला . गुंडेवाडी येथील मतदान केंद्रावर एकूण तीन खोल्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. खोली क्रमांक एक मध्ये एकूण 7 51 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर खोली क्रमांक दोन मध्ये 713 मतदारांनी मतदान केले खोली क्रमांक तीन मध्ये 457 मतदारांनी मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवला.
खोली क्रमांक एक मध्ये सायंकाळी साडेपाच नंतर मतदारांची रांग कायम असल्याने 85 मतदारांना मतदानासाठी चिठ्ठ्या देण्यात आल्या सर्व मतदारांनी मतदानाची संधी मिळावी यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन केले शेवटचे मतदान रात्री 6. 45 वाजता पूर्ण झाले.
संपूर्ण मतदान प्रक्रिया दरम्याने पोलीस बंदोबस्त व निवडणूक अधिकाऱ्यांची दक्षता यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही निवडणूक कर्मचारी पोलीस प्रशासन व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे गुंडेवाडी येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान अत्यंत शांततेत सुरळीत पार पडले.

