योगामुळे जीवन समृद्ध होते. उपसरपंच श्री.सागर शिराळकर
योगामुळे जीवन समृद्ध होते. उपसरपंच श्री.सागर शिराळकर
वाकुर्डे खुर्द तालुका शिराळा येथे उपसरपंच श्री.सागर शिराळकर हे प्रत्येक रविवारी गावासाठी नवनवीन योजना राबवत असतात आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग योग प्रशिक्षक श्री. निखिल बाळकृष्ण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली योग शाळा आयोजित केली होती.
हा आंतरराष्ट्रीय योग दिवस अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाला. योगाचा कार्यक्रम श्री.वाकेश्वर मंदिर वाकुर्डे येथे घेण्यात आला.योग प्रशिक्षक श्री .निखिल साळुंखे यांनी दिलीपराव नाईक विद्यामंदिर चे विद्यार्थी, शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ यांना योगाचे धडे दिले. उत्साही व आनंदी वातावरणामध्ये योग प्रशिक्षक निखिल साळुंखे यांनी विविध प्रकारची योगासने,प्राणायाम,ध्यान घेतले.
ज्याचा सर्वांना भावी आयुष्यासाठी अतिशय चांगला उपयोग होईल.विद्यार्थी शिक्षक व पालक यांनी ही योगासने वर्षभर करण्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य, सेवा सोसायटी सदस्य, ग्रामस्थ, विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री .निखिल साळुंखे यांचा स्वागत व सत्कार उपसरपंच श्री.सागर शिराळकर. ग्रामपंचायत सदस्य श्री. विजय जाधव श्री.रंगराव पाटील सर अंगणवाडी सेविका, श्री.एस.एम पाटील सर श्री. अमर जाधव यांच्या हस्ते करण्यात आला
