ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागपूर येथे होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनास वयोवृद्ध अनुयायांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसंदर्भात तात्काळ शासकीय परिपत्रक काढून अंमलबजावणी करावी अन्यथा तीव्र आंदोलन – भारतीय दलित महासंघ


*नागपुर या ठिकाणी होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वयोवृद्ध अनुयायासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसंदर्भात तात्काळ शासकीय परिपत्रक काढून त्याची अंमलबजावणी करावी, या मागणीचे सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाठ यांना निवेदन सादर, अन्यथा तीव्र आंदोलनाचा भारतीय दलित महासंघाचा इशारा*.

विजया दशमी दसऱ्याच्या दिवशी नागपूर या ठिकाणी पवित्र दीक्षाभूमीवर महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीला व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात . महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने साठ वर्षावरील वयोवृद्ध अनुयायासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे .त्या अनुषंगाने सामाजिक न्याय विभागाचा निधी सदरच्या योजनेसाठी वापरण्यात येत आहे . पवित्र दीक्षाभूमीचा समावेश मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये आहे . तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत साठ वर्षावरील महिला व पुरुष यांना पवित्र ठिकाणी जाण्यासाठी प्रवासाचा , राहाण्याचा खर्च सामाजिक न्याय विभागाच्यावतीने केला जातो .

परंतु धम्मचक्र प्रवर्तन दिनाला केवळ १ आठवडा शिल्लक असताना नागपूरला जाणाऱ्या अनुयायासाठी शासनाने कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा परिपत्रक काढलेले नाही त्यामुळे आंबेडकरी समाजातील वयोवृद्ध धम्मबांधवांना या योजनेचा लाभ मिळणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे . धम्मचक्र प्रवर्तन दिनाला अवघा काही अवधी शिल्लक असताना महाराष्ट्र शासनाने तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी , येणाऱ्या अनुयायांची गैरसोय टाळण्यासाठी कोणतेही पाऊल उचललेले नाही . या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने वयोवृध्द अनुयायांच्या प्रवासाची व राहाण्याची गैरसोय होवू नये म्हणून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचे तात्काळ परिपत्रक काढून रेल्वे , बसस्थानक वर्तमानपत्राच्या माध्यमातून अर्ज करण्याची तारीख व सवलतीचा तक्ता दर्शनीय स्थळी लावावा , अन्यथा सामाजिक न्याय विभागाच्या निधीचा वापर हा ज्या बौद्ध अनुयायांच्या सोयीसाठी होत नसलेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा भारतीय दलित महासंघाच्यावतीने निवेदणाद्वारे देण्यात आला .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *