माजी सरपंच देवेंद्र पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
माजी सरपंच देवेंद्र पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
४०० वृक्षांचे वाटप तसेच नगरपंचायत सफाई कामगारांना ब्लॅन्केट वाटप
शिराळा/ प्रतिनिधी
रवि यादव
शिराळा येथे माजी सरपंच देवेंद्र पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी यांच्या वाढदिवसानिमित्त शिराळा युवक संघटना व देवेंद्र पाटील मित्र परिवार यांचे वतीने आंबा या वृक्षाच्या ४०० रोपांचे वाटप, शिराळा नगरपंचायत पाणी पुरवठा विभाग येथे सर्व सफाई कर्मचारी यांना ब्लॅन्केट चे वाटप, शहरातील अंगणवाडीतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच बधीर मूक विद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी धान्य दिले. यावेळी संघटनेच्या वतीने लक्ष्मी चौक येथे मा.पं.स. सदस्य लालासो तांबीट यांच्या हस्ते केक कापून कार्यकर्तेनी देवेंद्र पाटील यांचा वाढदिवस साजरा केला.
या कार्यक्रमासाठी शिराळा पो.स्टेशन चे ए.पी.आय. राहुल अतिग्रे, पी.एस. आय. उदय पाटील, शिराळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज कांबळे, बांधकाम अभियंता संजीव जाधव, तसेच पत्रकार दिनेश हसबनीस,विकास शहा, शिवाजी चौगुले, प्रितम निकम, अजित महाजन, महेश कुलकर्णी, रवी यादव सुभाष कदम, मा.पं.स. सदस्य लालासो तांबीट, शिराळा युवक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कांबळे, टमटम युनियन संघटनेचे अध्यक्ष विजय सातपुते, संतोष लोहार, आसिफ काझी, अशोक पाटील, वैभव कुंभार, प्रशांत शेटे, धर्मेंद्र अलेकर, सुभाष कदम बापू, विनोद घाडगे, मंगेश कांबळे, महेश कांबळे, रणजित नलवडे, विकास कार्वेकर, प्रदिप सुर्यवंशी, नगरपंचायत अधिक्षक चंद्रकांत पाटील, वरिष्ठ लिपिक आबाजी दिवाण, सदानंद टिळे, मनसेचे अविनाश खोत, अशोक दळवी, काशिनाथ कांबळे, शंकर पाटील, सुरेश कदम तसेच शिराळा युवक संघटनेचे सदस्य, पदाधिकारी शेतकरी बांधव तसेच मान्यवर उपस्थित होते.

